भारताच्या टी-20 संघात नवे चेहरे : इशान किशन, सूर्यकुमार यादव व राहुल तेवटीया

New faces in India T20 squad Ishan Kishan Suryakumar Yadav and Rahul Tewatia

इंग्लंडविरूध्दच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. गेल्या वर्षी आयपीएल गाजवलेले मुंबई इंडियन्सचा सूर्यकूमार यादव, राजस्थान राॕयल्सचा राहुल तेवतीया व आजच विजय हजारे ट्राॕफीत तुफानी शतक केलेला झारखंडचा इशान किशन यांना संघात स्थान मिळले आहे. 12 मार्चपासून या मालिकेचे पाचही सामने अहमदाबाद येथे मोतेरा स्टेडियमवर खेळण्यात येणार आहेत.

संघ असा..

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के.एल.राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चाहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वाॕशिंग्टन सुंदर, राहुल तेवटीया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER