नवं समीकरण : शिवसेना आणि अकाली दल एकत्र? शेतकऱ्यांच्या सर्व आंदोलनांना ठाकरेंचा पाठिंबा

Prem Singh Chandumajra - Uddhav Thackeray

मुंबई : शिवसेनेचे नवे राजकीय समीकरण जुळताना दिसून येत आहे. ‘एनडीए’ (NDA) मधून बाहेर पडलेल्या दोन पक्षांची एकजूट होण्याची शक्यता बळावली आहे. कारण शिरोमणी अकाली दल (Shiromani Akali Dal) आणि शिवसेना असे नवे समीकरण जुळताना दिसत आहे. आज अकाली दलाचे उपाध्यक्ष आणि खासदार प्रेमसिंग चंदू माजरा (Prem Singh Chandumajra) याची शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत शेतकऱ्यांच्या सर्व आंदोलनांनाउद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला असून दिल्लीच्या समन्वय बैठकीमध्येही ते सहभागी होणार आहे.

केंद्र सरकारने लागू केलेला कृषी कायदा रद्द करण्यासाठी देशातील सर्व स्थानिक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची आम्ही भेट घेत आहोत. सर्व पक्षांनी एकत्र यावे, यासाठी आम्ही हे आव्हान करत आहोत. शिरोमणी अकाली दलाची भूमिका मान्य असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीदरम्यान सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही आम्ही आज भेट घेणार आहोत, मात्र ती झाली नाही तर दिल्लीमध्ये आम्ही देशातील सर्व स्थानिक राजकीय पक्षांची बैठक घेणार आहोत. त्या बैठकीचे नेतृत्व शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंग बादल हे करणार आहेत. दिल्लीच्या समन्वय बैठकीमध्ये खुद्द उद्धव ठाकरे सहभागी होणार आहे. शरद पवारांपासून ममता बॅनर्जीपर्यंत अनेक पक्षांचे प्रमुख नेते, पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून ही बैठक पुढील दोन महिन्यात होणार आहे, अशी माहितीही माजरा यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER