राज्यात लवकर नवे शैक्षणिक धोरण : हसन मुश्रीफ

Hasan Mushrif

कोल्हापूर : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार राज्यात लवकरच नवे शैक्षणिक धोरण जाहीर करणार आहे. शिक्षक व शिक्षण क्षेत्राच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शिक्षकांनी संस्कारक्षम व जिज्ञासू नवी पिढी घडवावी अशी अपेक्षा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. शिक्षकदिनानिमित्त “थॅंक अ टीचर” या अभियानांतर्गत मुंबईतून मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी ऑनलाईन तीनशेहून अधिक शिक्षकांशी संवाद साधला.

या संवादात मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोरोना (Corona) काळात सहा महिने मुले घरात बसून आहेत, त्यांना गुंतवून ठेवलं पाहिजे, नाही तर भरकटतील. त्यामुळेच अहमदनगरच्या संदीप गुंड आणि मयूरेश पाटील यांनी तयार केलेले ‘ऑनलाईन शाळा’ हे ॲप कोल्हापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले आहे.

विद्यामंदिर बेलवळे खुर्द येथील पुनम उमेश पाटील आणि केंद्रशाळा तमनाकवाडा रूपाली सुतार यांनी ‘ऑनलाईन शाळा’ ॲपचा वापर, विद्यार्थ्यांचा सहभाग, पालकांचा प्रतिसाद याविषयी मार्गदर्शन केले. आयोजन कागलचे गट शिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर यांनी केले. कागल पंचायत समितीचे सभापती विश्वासराव कुराडे, जि.प. शिक्षण समितीचे निमंत्रित सदस्य सुकुमार पाटील, संघटना प्रतिनिधी एस. के.पाटील, मुख्याध्यापक प्रतिनिधी यांनी मनोगत व्यक्त केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER