MPSC परिक्षेसाठी नव्या तारखा जाहीर

MPSC

मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकूडन नव्याने तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. नव्या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १४ मार्च २०२१ रोजी होणार आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २७ मार्चला होईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा ११ एप्रिलला होईल.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे. कोरोनामुळे तसेच मराठा आरक्षण मुद्यामुळे या परिक्षांना वारंवार या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यापूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षा गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात होणार होती, पण मराठा आरक्षणप्रश्नी मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती.

सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळत असतानाच MPSC परीक्षा जाहीर झाल्या होत्या. मात्र मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत एमपीएससी परीक्षा घेतली जाऊ नये, अशी मागणी विविध संघटना, नेत्यांकडून होत होती. याच पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. यापूर्वीही MPSC परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली होती.

अशा होणार परीक्षा

राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० ही आधी ११ ऑक्टोबर २०२० ला घेण्यात येणार होती ती आता १४ मार्च २०२१ रोजी घेण्यात येईल. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० ही १ नोव्हेंबर २०२० रोजी होणार होती जी आता २७ मार्च २०२१ ला होईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २२ नोव्हेंबर ऐवजी आता ११ एप्रिल २०२१ रोजी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER