२४ तासात महाराष्ट्रात १९ हजारांपेक्षा जास्त नवे करोना रुग्ण, ४५९ मृत्यू

Coronavirus Maharashtra

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) मागील २४ तासांमध्ये १९ हजार १६४ नवे करोना (Corona) रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आज राज्यात एकूण ४५९ कोविड (COVID-19) बाधित रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे. गेल्या काही दिवसातील हा सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे राज्यातील एकूण मृत्यूदर हा २.६८ टक्के इतका झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण मृत्यूदर हा २.६८ टक्के इतका झाला आहे. आज राज्यात नव्याने १९ हजार १६४ रुग्णांचे निदान करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली.

आत्तापर्यंत महाराष्ट्रात ३४ हजार ३४५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांमध्ये १७ हजार १८४ रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ९ लाख ७३ हजार २१४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रात २ लाख ७४ हजार ९९३ अ क्टिव्ह केसेस आहेत. आज राज्यात १९,१६४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ४५९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६८ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६१,९०,३८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२,८२,९६३ (२०.७२) टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात १८,८३,९१२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३३,४१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER