नवीन कृषी कायदे म्हणजे यूपीए सरकारने केलेल्या पापाचे प्रायश्चित्त – नरेंद्र मोदी

नव्या कृषी कायद्यात जी कठोरता आहे ती शेतकऱ्यांसाठी नसल्याचा दावाही मोदींनी केला आहे

PM_Narendra_Modi

नवी दिल्ली :- केंद्र सरकारनं केलेल्या कृषी कायद्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समर्थन करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे . नवीन कृषी कायदे म्हणजे मागील सरकारचं प्रायश्चित्त  असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकरी महासंमेलनाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. नव्या कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांच्या  मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी यावेळी केला. (PM Narendra Modi on new agricultural law)

मागील सरकारच्या पापाचं प्रायश्चित्त

शेतकऱ्यांना फक्त आडतीमध्ये बांधून मागील सरकारनं जे पाप केलं, त्याचं प्रायश्चित्त  म्हणजे हे कृषी कायदे असल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केलाय. देशात कृषी कायदे लागू होऊन सहा महिने लोटले; पण देशातील एकही मार्केट कमिटी बंद झालेली नाही. मग विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचं काम का सुरू आहे? असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी केलाय.

MSPला कुठलाही धोका नाही

मागील सरकारच्या काळात गहू १४०० रुपये किमान आधारभूत अर्थात MSP किंमत मिळायची. आम्ही १९७५ रुपये MSP देत आहोत. मागील सरकार धानाला १३१० रुपये एमएसपी देत होते. आम्ही ती १८७० रुपये केली. यावरून आमचं सरकार MSPला किती महत्त्व देतं हे सिद्ध होतं. आम्हाला MSP हटवायची असती तर स्वामिनाथ कमिटीचा अहवाल आम्ही लागूच केला नसता. मी शेतकऱ्यांना विश्वास देतो की, MSP बंद होणार नाही, अशा शब्दात नव्या कृषी कायद्यात MSP ला कुठलाही धोका नसल्याचा विश्वास मोदींनी दिला आहे.

कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगवरून विरोधकांवर टीकास्त्र

विरोधकांकडून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगबाबतही खोटं पसरवण्याचं काम सुरू आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये आधीपासूनच कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग योजना लागू आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांना गुंतवणुकीतून फायदा मिळावा हीच आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. नव्या कृषी कायद्यात जी कठोरता आहे ती शेतकऱ्यांसाठी नसल्याचा दावाही मोदींनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER