महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता “कृष्णकुंज”! मनसेचा शिवसेनेला टोमणा

Sandeep Deshpande & Uddhav Thackeray

मुंबई : कोरोना (Corona) लॉकडाउन काळात बंद करण्यात विविध उद्योगधंदे अनलॉक काळात सुरु करणे किंवा इतर समस्या सोडवण्यासाठी सरकारकडे प्रयत्न केले पण यश मिळाले नाही मात्र यातले बरेच प्रश्न संबंधितांनी मनसेचे नेते राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर, राज यांच्या पुढाकाराने सुटले. यावरून, जनतेचे प्रश्न उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार नाही; राज ठाकरे सोडवतात असे सूचित करताना मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी टोमणा मारला – … मंत्रालयाचा नवीन पत्ता राज ठाकरे (Raj Thackeray) कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई २८.

संदीप देशपांडे यांनी ट्विट केले – समस्या अनेक उपाय एक, महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता राज ठाकरे कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई २८. आतापर्यंत राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे जाऊन, जिम चालक, पुजारी, केबलचालक, बेस्टचे कंत्राटी कर्मचारी, कोळीबांधव, बॅण्डवाले, वारकरी, मूर्तीकार, डबेवाले, वीजबिल ग्राहक व डॉक्टरांच्या शिष्टमंडळ आदी संघटनांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांसाठी भेट घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER