राणू मंडलचा ‘मेकओव्हर’; सोशल मीडियावर उडवली खिल्ली

ranu-mandal-make-over

मुंबई :- काही दिवसांपूर्वीपर्यंत रेल्वे स्टेशनवर गात भीक मागणारी राणू मंडल आज एक बॉलिवूड स्टार आहे. आता ती अभिनेता, गायक आणि दिग्दर्शक हिमेश रेशमियाच्या आगामी चित्रपटात गाणे गाताना दिसत आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे, ती राणू मंडल हिच्या एका फोटोची. या फोटोमध्ये राणूने मेकअप केला असल्याचे दिसत आहे.

तो व्हायरल झालेला फोटो एका कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमात राणूने डिझायनर ड्रेस परिधान केला असून त्या ड्रेसवर हेवी मेकअप केला आहे. तसेच या कार्यक्रमाचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राणू रॅम्पवर वॉक करताना दिसत आहे. रॅम्प वॉक करताना अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या चित्रपटातील ‘फॅशन का है ये जलवा’ हे गाणे सुरू असल्याचे पाहायला मिळते. मात्र राणूचा हा लूक चाहत्यांच्या फारसा पसंतीला उतरला नसल्याचे पाहायला मिळते. नेटकऱ्यांनी राणूवर मिम्स तयार केले असून त्याद्वारे तिची खिल्ली उडविण्यात आली आहे.