तेथील आमदार आहेत भाजपचेच ! चित्रा वाघ यांना नेटीजन्सचे प्रत्युत्तर

मुंबई : भाजपाच्या (BJP) महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात, एका ८ वर्षांच्या विध्यार्थ्याला धमकावून त्याच्याकडून कोविड सेंटरमधील संडास साफ करुन घेतल्याची संतापजनक घटना घडल्याचे सांगितले. कारवाईची मागणी केली.

‘अतिशय गंभीर व संतापजनक प्रकार बुलढाणा संग्रामपूर तालुका मारोड गावातील शाळेच्या विलगीकरण कक्षात घडला आहे. या विलगीकरण कक्षात 15 कोविड पेशंट असतांना 8 वर्षाच्या शाळकरी मुलाला धमकावून त्याच्याकडून संडास साफ करून घेण्यात आलं. लाज वाटली पाहिजे प्रशासनाला,’ असे म्हणत चित्रा वाघ यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ट्विटमध्ये मेन्शन केले आहे.

चित्रा वाघ यांच्या ट्विटवर काही जणांनी संग्रामपूरचे आमदार संजय कुटे हे भाजपाचेच असल्याची आठवण वाघ यांना करुन दिली. भाजपाच्या आमदाराची जबाबदारी नाही का? असा सवालही चित्रा वाघ यांना विचारला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button