नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली बहुमत सिद्ध करण्यात अपयशी

K. P. Sharma Oli

काठमांडू : नेपाळचे (Nepal) पंतप्रधान के.पी. शर्मा ओली (K. P. Sharma Oli) यांना मोठा झटका बसला आहे. नेपाळच्या संसदेत प्रतिनिधी सभेत त्यांना बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं. राजकीय संकटाचा सामना करणाऱ्या ओली यांना हा आणखी एक झटका मानला जात आहे. नेपाळच्या संसदेमध्ये आवश्यक विश्वास मतं प्राप्त करण्यात अपयशी ठरल्यानंतर पंतप्रधान ओली यांचं पद सोमवारी रद्द झालं. पंतप्रधान ओली यांनी भारताबाबत घेतलेल्या वादग्रस्त निर्णयामुळे सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षात मतभेद सुरू झाले होते. भारताविरोधात घेतलेली भूमिका आणि वक्तव्यांमुळे नेपाळमधील नागरिकांमध्ये असंतोष पसरला होता. मात्र आता तेच पंतप्रधानपदावरून पायउतार झाले आहे.

नेपाळ संसदेतील प्रतिनिधी सभेमध्ये अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. यावेळी निर्णायक मतं मिळवण्यात पंतप्रधान ओली अपयशी ठरले. त्यांना केवळ ९३ मतं प्राप्त झाली. पंतप्रधान यांच्या विरोधात १२४ मतं पडली. प्रतिनिधी सभेत सोमवारी मतदान प्रक्रियेत एकूण २३२ खासदारांनी सहभाग घेतला. त्यापैकी १५ खासदार तटस्थ राहिले.

यापूर्वी कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळनं (माओवादी केंद्र) नीत पुष्पकमल दहल गटानं सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यानंतर पक्षावर आपली पकड मजबूत करण्यासाठी ओली प्रयत्नशील होते. काही दिवसांपूर्वी भारतासोबत निर्माण केलेल्या संबंधांवरून ओली चर्चेत आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button