मराठा आरक्षणाकडे ना उद्धव ठाकरेंनी लक्ष दिलं ना शरद पवारांनी – चंद्रकांत पाटील

Uddhav Thackeray-Chandrakant Patil-Sharad Pawar

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha reservation) सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर झालेल्या सुनावणीत न्यायालयानं आज नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण सध्या लागू होणार नाही, असं सांगतलं. आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर या खटल्याची सुनावणी मोठ्या खंठपीठाकडे सोपवण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता मोठ्या खंठपीठासमोर सुनावणी होणार आहे.

यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. आरक्षणाची सुनावणी मोठ्या खंडपीठाकडे गेल्यानंतर आता त्याच्यावर कधी सुनावणी होईल हे अधांतरी असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. असे अनेक प्रकरणं खंडपीठाकडे प्रलंबित आहेत.  त्यावर २० – २० वर्षे निर्णय झालेला नाही. त्यामुळे मराठा आरक्षणास तूर्तास स्थगिती वगैरे म्हणण्यात अर्थ नाही.

मराठा आरक्षण आमच्या सरकारने दिले; मात्र महाविकास आघाडीला ते टिकवता आले नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. वारंवार लक्षात आणून देऊनही राज्य सरकारमधील कोणत्याही मंत्र्याने  किंवा मोठ्या नेत्यांनी आरक्षणाकडे लक्ष दिले नाही. हे आरक्षण कोर्टात टिकवण्यासाठी ना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) लक्ष दिलं ना शरद पवारांनी  (Sharad Pawar), असा घणाघातही चंद्रकांत पाटील यांनी केला. मराठा आरक्षण आता खंडपीठाकडे गेल्याने हे आरक्षण अधांतरी असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER