पनवती ठाकरे सरकारला फक्त दारूबंदी उठवायला जमली : निलेश राणेंचे टीकास्त्र

Nilesh Rane criticise Uddhav Govt

मुंबई : भाजपचे नेते निलेश राणे(Nilesh Rane) यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे . राणे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की , ना मराठ्यांचे आरक्षण टिकवले ना ओबीसींचे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून काहीच चांगलं घडताना दिसत नाही. स्वत:ला ओबीसी नेते म्हणणारे सरकारमधील मंत्री गेलेत कुठे? की फक्त सत्तेसाठी समाजाचे राजकारण करायचे. या पनवती ठाकरे सरकारला (panvati-thackeray-government)फक्त दारूबंदी उठवायला जमली.’ अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी टीकास्त्र डागलेले आहे.

दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाअंतर्गत राखीव जागांच्यासंदर्भात राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. यावरून महाराष्ट्रातील राजकारण सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत .

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button