नेहाला मिळाला लेट मार्क

Neha Pendse

लेट मार्क हा शब्द माहीत नाही अशी व्यक्ती नसेल. शाळा-कॉलेज पासूनऑफिसपर्यंत अनेकांना कधी ना कधी, काही कारणाने लेटमार्क लागतो. मग त्यासाठी बॉसची बोलणी ऐकून घ्यावी लागतात तर कधी खरंच असं काही कारण घडतं की त्यामुळे घरातून कितीही लवकर निघालं तरी पोहोचायला उशीर होतो. पण जेव्हा तुमच्या कामाचा पहिलाच दिवस असेल आणि त्याचदिवशी जर लेटमार्क लागला तर खूप वाईट वाटते. अभिनेत्री नेहा पेंडसेच्यासोबत नेमकं हेच घडलं आणि भाभीजी घर पे है? या मालिकेच्या शूटिंगसाठी जात असताना पहिल्याच दिवशी नेहा मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अशी काही फसली की तिला सेटवर पोहोचायला उशीर झाला. अर्थात उशिरा पोहोचण्याचं कारण ऐकल्यानंतर सगळ्यांनी तिला सांभाळून घेतलं आणि अनिता भाभी म्हणून तिचा नवा प्रवास दणक्‍यात सुरू झाला.

मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार हिंदी मालिकांमध्ये काम करायला मिळावं असे स्वप्न पाहत असतात. सहाजिकच हिंदी मालिकांचा कॅनव्हास खूप मोठा आहे आणि या हिंदी मालिकांमध्ये मिळणारी एक संधी अभिनयातील करिअर घडवू शकते हे नाकारून चालणार नाही. अशीच संधी मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे हिला आली. खरंतर नेहा ही मराठमोळी अभिनेत्री आहे पण तरीदेखील हिंदी भाषेवर चांगले प्रभुत्व असल्यामुळे तिला हिंदी मालिकांच्या ऑफर्स येत होत्या. हिंदी मालिकांच्या विश्वातील खूप लोकप्रिय मालिका म्हणून भाभीजी घर पे है? या मालिकेचं नाव घेतलं जातं. गेल्या पाच वर्षापासून ही मालिका लोकप्रियतेत वरच्या क्रमांकावर आहे. या मालिकेतील अनिता भाभी हे अतिशय मॉडेल स्त्री पात्र साकारण्याची संधी अभिनेत्री नेहाला मिळाली आहे. ही भूमिका आधी अभिनेत्री सौम्या टंडन करत होती. तिनेही ही भूमिका तिच्या अभिनयाने प्रचंड लोकप्रिय केली होती, ती काही वैयक्तिक कारणांमुळे सौम्याने ही मालिका सोडणार होती ही मालिका सोडली. मालिकेच्या टीम कडून अनिता भाभी या व्यक्तिरेखेसाठी शोध सुरू झाला. नेहा पेंडसेने ही भूमिका मिळवण्यात बाजी मारली आणि एक मराठमोळा चेहरा आता हिंदी लोकप्रिय हिंदी मालिकेमध्ये दिसणार आहे तो नेहा पेंडसेच्या रूपाने.

या मालिकेचं चित्रीकरण मुंबईत सुरू आहे. नेहाचा मालिकेच्या शूटिंगला जाण्याचा मंगळवारी पहिला दिवस होता. शिफ्टनुसार ती घरातून वेळेवरच निघाली खरी पण मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये जवळपास दोन तास अडकून राहिली. तिच्या सोशल मीडिया पेजवर ट्रॅफीकमध्ये अडकलेला व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती असं म्हणते की, आज माझ्या नव्या कामाचा पहिला दिवस आहे . खरेतर मी वेळेच्याआधी बराच वेळ घरातून निघाले पण मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये माझे दोन तास रस्त्यावरच गेले. एखादा कलाकार सेटवर जेव्हा उशिरा पोहोचतो तेव्हा खूप नुकसान होत असते. अनेक कलाकार तयार होऊन थांबलेले असतात. एका कलाकाराच्या उशीरा येण्यामुळे जेव्हा सगळ्या गोष्टी पुढे जातात तेव्हा कलाकार म्हणून खूप अपराधी वाटत असतं. नेहा सांगते की भाभीजी घर पे है? या मालिकेच्या शूटचा माझा पहिलाच दिवस होता आणि मला सेटवर पोहोचायला खूप उशीर झाला याचं मला खूप वाईट वाटलं पण जेव्हा मी सेटवर आले आणि अनिता भाभीच्या रूपात तयार झाले, जेव्हा एकेक सीन करत गेले त्यानंतर मला जो काही ट्रॅफिकमध्ये त्रास झाला होता तो कुठच्या कुठे पळून गेला. सेटवर सगळ्यांनी माझी अडचण समजून घेतली म्हणून हे शक्य झाले.

शार्दुल सिंहबरोबर लग्न करून कॅमेऱ्याच्या मागे गेलेली अभिनेत्री नेहा पेंडसे बऱ्याच दिवसांनी ऑन स्क्रीन येणार आहे. त्यामुळे सहाजिकच तिचे चाहते सुखावले आहेत. भाग्यलक्ष्मी या मालिकेतून नेहा पेंडसेचे टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आगमन झालं. सोशिक सून हा मालिकेतील ट्रेंड भाग्यलक्ष्मी या मालिकेत दाखवण्यात आला होता. खरेतर नेहाची इमेज खूप बोल्ड आहे. परंतु तिने आपल्या करिअरची सुरुवात अत्यंत साध्या ,सासरच्या लोकांचा त्रास सहन करणाऱ्या सुनेच्या रूपात केली. त्यामुळे नेहा पुढे काय करणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये होती. भाग्यलक्ष्मी मालिकेतील काशी ही व्यक्तिरेखा अत्यंत लोकप्रिय झाली होती. त्यानंतर ती तेलुगू मल्याळम अशा प्रादेशिक भाषांमधील सिनेमातही दिसली. बिग बॉस च्या १२ व्या सीझनमधला मराठी चेहरा म्हणून नेहाने शंभर दिवस प्रेक्षकांचे लक्ष केंद्रित करण्यात बाजी मारली होती.

मूळची मुंबईची असलेली नेहा पेंडसे शालेय वयापासूनच अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहत होती. काही नाटक एकांकिका केल्यानंतर तिला टीव्ही मालिकेत संधी मिळाली. मध्यंतरी तिच्या काही बिनधास्त फोटोंमुळे देखील ती चर्चेत आली होती. तीचे स्टाइल स्टेटमेंट मध्ये काम करणाऱ्या माध्‍यमांमध्‍ये फोटोसेशन जोरात सुरू होते. जानेवारीमध्ये तिने शार्दुल सिंह यांच्या बरोबर लग्न केले या तिच्या लग्नाचे देखील अनेक व्हिडीओ फोटो तिच्या चाहत्यांनी डोक्यावर घेतले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER