नीतू कपूर यांना एअर अॅम्ब्युलन्सने आणले मुंबईला

neetu Singh

स्वर्गीय अभिनेता ऋषी कपूर यांची पत्नी आणि अभिनेता रणबीर कपूरची आई अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी पुन्हा चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली खरी, पण त्यांना कोरोनाने जखडले. त्यामुळे रणबीर कपूरने आईसाठी एअर अॅम्ब्युलन्स ( air ambulance) पाठवून चंदीगढहून मुंबईला उपचारासाठी आणले आहे.

ऋषी कपूरच्या निधनानंतर कोरोनामुळे घरात बसलेल्या नीतू कपूर यांनी पुन्हा चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार करण जोहर निर्मित ‘जुग जुग जियो’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी त्या गेल्या आठवड्यात चंदीगढला गेल्या होत्या. जाताना त्यांनी कोरोनाची टेस्ट केली होती जी निगेटिव्ह आली होती. काही दिवस चित्रपटाचे शूटिंग केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी चित्रपटाचा दिग्दर्शक राज मेहता आणि अभिनेता वरुण धवन, अनिल कपूर यांच्यासह नीतू कपूर यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. मात्र अनिल कपूर यांनी त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याचे स्पष्ट केले होते.

नीतू कपूर आणि दिग्दर्शक राज मेहता यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. नीतू कपूर यांचे वय झालेले असल्याने आणि चंदीगढमध्ये त्यांची काळजी घेणारे कोणी नसल्याने रणबीर कपूरने लगेचच एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करीत त्यांना मुंबईला पुढील उपचारासाठी आणले आहे.

दिग्दर्शक आणि कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याने चित्रपटाचे शूटिंग अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आल्याची माहिती धर्मा प्रॉडक्शनच्या सूत्रांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER