नीतू कपूरने काम करण्यास सुरुवात केली

Nitu Kapoor

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांची पत्नी अभिनेत्री नीतू कपूरने (Neetu Kapoo) पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर काम करण्यास सुरुवात केली आहे. राज मेहता दिग्दर्शित ‘जुग जुग जियो’ चित्रपटात नीतू कपूर काम करीत असून या चित्रपटाच्या शूटिंगसाठी चित्रपटातील अन्य कलाकारांसोबत गुरुवारी एका खासगी विमानाने ती चंदीगडला रवाना झाली. ऋषी कपूर यांचे निधन झाल्यानंतर त्यांची मुलगी रिद्धिमा आईकडेच होती. सहा महिन्यांनंतर ती बुधवारी दिल्लीला तिच्या घरी परत गेली आणि गुरुवारी नीतू कपूर पुन्हा कामाला लागली.

याबाबत नीतू कपूरने इन्स्टाग्रामवर (Instagram) एक अत्यंत भावनिक अशी पोस्ट टाकली आहे. यात कोरोनाचे (Corona) संकट आणि ऋषी कपूरची आठवण नीतू कपूरने काढली आहे. पोस्टमध्ये नीतू कपूरने लिहिले आहे, मी ऋषीला मिस करते आहे. कारण तो नेहमी माझा हात पकडत असे. परंतु आज त्याने माझा हात पकडलेला नाही. परंतु मला ठाऊक आहे की, तो माझ्यासोबतच आहे. मुलगा रणबीर कपूर आणि मुलगी रिद्धिमा कपूर साहनीने मला पुन्हा काम करण्यास प्रेरित केले. त्याबद्दल मी त्या दोघांना धन्यवाद देते. कोरोना काळानंतर माझी ही पहिलीच फ्लाईट असल्याने मी अत्यंत नर्व्हस आहे. जुग जुग जियो. कृपया लक्ष द्या. आमची कोविड-१९ चाचणी निगेटिव्ह आली आहे. आम्ही सगळे सुरक्षित आहोत. त्यामुळेच फोटो काढताना आम्ही मास्क काढले आहेत, असेही नीतू कपूरने पोस्टमध्ये लिहिले आहे. या पोस्टसोबत नीतू कपूरने एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये यूट्यूबवर प्राजक्ता कोळी, वरुण धवन, कियारा आडवाणी आणि अनिल कपूर दिसत आहेत.

ही बातमी पण वाचा : उर्वशी रौतेलाने केले २४ कॅरेट सोन्याचे मेकअप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER