नीतू कपूरने शेअर केला ऋषी कपूर सोबतच डान्स व्हिडीओ, म्हणाली- ‘हमारा पहला डांस’

दिवंगत अभिनेता ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांनी जगाला निरोप देऊन जवळपास नऊ महिने उलटले आहेत. ऋषी कपूर यांची पत्नी नीतू कपूर अनेकदा त्यांना स्मरण करते. नीतू कपूर (Neetu Kapoor) ऋषी कपूर यांच्या सोबतच्या आपल्या जुन्या आठवणी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असतात. नुकताच नीतू कपूरने ऋषी कपूर सोबतचा आपला पहिला डान्स व्हिडिओ शेअर केला आहे.

नीतू कपूर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव राहते. ती अनेकदा बरीच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते. नीतू कपूर पती ऋषी कपूरबरोबर कधी न पाहिलेले व्हिडिओ आणि छायाचित्रेही शेअर करत असते. आता नुकताच नीतूने ऋषी कपूरसोबतचा आपला पहिला डान्स व्हिडिओ शेअर केला आहे.

नीतू कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ऋषी कपूर आणि नीतू कपूर एकत्र नाचत आहेत. हे दोघेही १९७५ मध्ये रिलीज झालेल्या ‘जिंदा दिल’ चित्रपटाच्या ‘शाम सुहानी’ गाण्यावर नाचत आहेत. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये नीतूने लिहिले आहे – ‘हमारा पहला डांस’.

नीतू कपूरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला खूप पसंत केले जात आहे. नीतू आणि ऋषीची मुलगी रिद्धिमा कपूरनेही व्हिडिओवर कंमेंट केले आहे. तर त्याचवेळी सर्व स्टार्स आणि ऋषी कपूरचे चाहते हा व्हिडीओ बघून पुन्हा एकदा ऋषी कपूरच्या आठवणीत हरवले आहे.

सांगण्यात येते की २२ जानेवारी रोजी ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचा ४१ वा लग्नाचा वाढदिवस होता. या खास प्रसंगी नीतू कपूरने ऋषी कपूरसोबत एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओमध्ये ऋषी आणि नीतू एकत्र दिसले. विविध चित्रपटांचे दृश्ये देण्यात आली होती. काही वास्तविक जीवनातील झलक देखील होती. ज्याला चाहत्यांनी चांगलीच पसंत दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER