नीतू कपूरने पूर्ण केले ‘जुग जुग जियो’ सिनेमाचे शूटिंग

neetu

पती ऋषी कपूरच्या निधनानंतर दुःखी असलेल्या नीतू कपूरने मुलांच्या आग्रहाखातर दुःख कमी करण्यासाठी पुन्हा सिनेमात काम करण्यास सुरुवात केली. नीतूने जुग जुग जियो सिनेमा साईन केला. लॉकडाऊन उठल्यानंतर या सिनेमाच्या शूटिंगसाठी नीतू कपूर चंदीगढला गेली. या सिनेमात तिच्यासोबत अनिल कपूर, वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांच्याही भूमिका आहेत. मात्र पहिल्याच शेड्यूलमध्ये नीतूला कोरोनाची लागण झाली आणि ती पुन्हा मुंबईला परतली होती. केवळ नीतूच नव्हे तर वरुण धवन आणि दिग्दर्शकालाही कोरोनाची लागण झाली होती. परंतु या सगळ्यांनी कोरोनावर मात केली आणि पुन्हा शूटिंगला सुरुवात केली होती. नीतू कपूरने (Neetu Kapoor ) सिनेमातील काम संपल्याचे सोशल मिडियावर जाहीर करीत शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर केले आहेत.

नीतू कपूरनेने इंस्‍टाग्राम हँडल वर सिनेमाच्या शूटिंगमधील बिहाइंड द सीन मोमेंट्स शेयर करीत सेटवर शेवटचा दिवस असल्याचे सांगितले आहे. या बिहाईंड द सीन व्हीडियोमध्ये नीतू मेकअप सेशनच्या दरम्यान जेवताना दिसत आहे. त्यासोबतच नीतूने म्हटले आहे की, आज माझा या सेटवरील शेवटचा दिवस आहे. दुसऱ्या फोटोमध्ये मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टाईलिस्ट नीतूचा मेकअप आणि हेअरस्टाईलिंग करताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये नीतूने म्हटले आहे, ‘जुग जुग जियो’ ची टीम एका कुटुंबाप्रमाणे आहे. या सगळ्यांना मी मिस करेन. नीतूच्या या पोस्टवर तिची मुलगी रिद्धिमाने कमेंट करताना हार्टवाला इमोजी टाकला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER