जात पंचायतीकडून महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षा; नीलम गोऱ्हेंची गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे कारवाईची मागणी

Dilip Walse Patil-Neelam Gorhe

मुंबई :- अकोल्यात जात पंचायतीने एका महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षा दिली असल्याची घटना उघडकीस झाली आहे. या प्रकरणाची विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दखल घेतली आहे. या प्रकरणातील नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे.

नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse-Patil) यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. सोबतच या घटनेची माहितीही दिली आहे. अकोला जिल्ह्यातील वडगाव येथे ही घटना घडली आहे. पीडित  महिला जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील रहिवासी आहे. पीडित महिलेने साईनाथ नागो बाबर यांच्याशी २०११ साली विवाह केला होता. पतीच्या जाताला कंटाळून तिने २०१५ मध्ये घटस्फोट घेतला. पीडितीचे न्यायालयात जाणे जात पंचायतांना मान्य नव्हते. दरम्यान पीडित  महिलेने २०१९ मध्ये अनिल जगन बोडखे या घटस्फोटित व्यक्तीशी पुनर्विवाह केला. मात्र, यासाठी जात पंचायतने तिला एक लाख रुपयांचा दंड केला, असे नीलम गोऱ्हे यांनी पत्रात नमूद केले आहे.

९ एप्रिल २०१२ रोजी पंचांनी केळीच्या पानावर थुंकायचे व त्या महिलेने ते चाटायचे, अशी शिक्षा पीडित महिलेला देऊन विकृतीचे दर्शन घडविले. या प्रकारच्या घटना सातत्याने घडत असल्याने कठोरपणे कार्यवाही आणि जातपंचायत कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे, असे नीलम गोऱ्हे यांनी निवेदनात म्हटले आहे. जात पंचायतीचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. घटना घडल्यानंतर प्रथमतः तक्रार देण्यासाठी कोणी पुढे येत नाही. गुन्हा दाखल करण्यास विलंब होतो आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे माहिती मिळताच पोलिसांनी स्वतः गुन्हा दाखल करण्याकरिता प्रयत्न करावा. या प्रकरणात संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी, असे गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

१०-१५ दिवसाला आढावा घ्या
या प्रकारची घटना नोंद झाल्यानंतर तक्रार नागरी हक्क संरक्षण कक्षाकडे ताबडतोब द्यावे. पुढील कार्यवाही जलद गतीने होण्यासाठी वेळेचे निर्बंध घालून देण्यात यावे. जात पंचायतीच्या प्रकरणाचा आढावा PCR नागरी हक्क संरक्षण पोलीस महानिरीक्षक यांनी १०-१५ दिवसाला घेतला, तर अशा घटना नक्कीच आटोक्यात येईल. पोलिसात किंवा पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार सर्व जात पंचायतीच्या पंचांची माहिती गोळा करून  त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची सूचना देण्यात यावी. वरील मुद्द्यांवर त्वरित कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात यावेत, अशी मागणीही नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

Neelam Gorhe letter

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button