नीलम गोऱ्हे, सुप्रिया सुळे, यशोमती ठाकूर हरवल्या आहेत; तृप्ती देसाई यांची टीका

- शोधून देणाऱ्यांना ५०० रुपये बक्षीस

Trupti Desai & neelam gorhe &Supriya Sule &Yashomati Thakur

मुंबई :- राष्ट्रवादीचे (NCP) नेते, मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर रेणू शर्मा (Renu Sharma) या तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे. मात्र, यावर ठाकरे सरकारमधील एकाही महिला नेत्याची प्रतिक्रिया आली नाही. यावरून भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी शिवसेनेच्या (Shivsena) नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe), राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) व मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) (काँग्रेस) हरवल्या आहेत, अशी उपरोधिक टीका केली व माहिती देणाऱ्यास ५०० रुपये बक्षीस घोषित केले.

देसाई म्हणाल्या की, आपण महाराष्ट्रात असाल तर नक्कीच या प्रकरणावर जाहीरपणे बोला. सध्या गरज रेणू शर्माला तुमची आहे. हाथरस प्रकरणात तिघीही खूपच आक्रमकपणे पीडित मुलीला न्याय मिळविण्यासाठी पुढे सरसावल्या होत्या. परंतु दुर्दैव असे आहे की, आपल्या राज्यात एखादी महिला तिच्यावर अत्याचार झाला आहे असे सांगते आहे. पोलिसात तक्रार करत आहे, पुरावे देते आहे तरी गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत.

तुम्ही तिघी कार्यरत असलेल्या पक्षाच्या, युतीच्या ‘महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार’च्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडे मंत्री आहेत. म्हणून ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कारटे’ अशी भूमिका तुम्ही या प्रकरणात घेत आहात, असे सर्वसामान्य जनतेला वाटत आहे.

महिलांचे सबलीकरण यासाठी आवाज उठवत असताना आपल्या पक्षातील एखाद्या नेत्यावर आरोप झाले तर त्याविषयी बोलायचे नाही, अशी भूमिका तुमच्यासारख्या महिला नेत्या घ्यायला लागल्या तर महाराष्ट्रात महिला सबलीकरण होणे अशक्य आहे. आपण महाराष्ट्रात असाल तर नक्कीच या प्रकरणावर जाहीरपणे बोला.  सध्या तुमची गरज रेणू शर्माला आहे, असे देसाई म्हणतात.

ही बातमी पण वाचा : … हे सगळं शरद पवारांचे  नाटक ;  भाजप नेत्याची टीका 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER