अपयश झाकण्यासाठी शिवसेनेवर टीका, ही तर भाजपची केविलवाणी धडपड : शिवसेना नेत्याचे वक्तव्य

मुंबई :- विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत आपले अपयश झाकण्यासाठी शिवसेनेवर टीका करणे ही भाजपची केविलवाणी धडपड आहे, अशा शब्दात शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam gorhe) यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधल्या .

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. या यशानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आम्ही एक तरी जिंकलो, पण ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही, असे म्हणत शिवसेनेला लक्ष्य केले.

स्वत:चे अपयश झाकण्यासाठी शिवसेनेवर टीका करणे ही भाजपची केविलवाणी धडपड आहे. महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) स्थापन होऊन एक वर्ष झाले. या सरकारच्या माध्यमातून कोंडलेल्या लोकशाहीला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली. पुढचेही एक पाऊल म्हणायचे झाले, तर या सरकारमुळे ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश’ असे झाले आहे. नागपूर (Nagpur) आणि पुणे ही दोन मतदारसंघं दीर्घकाळापासून भाजपकडे होती. या मतदारसंघांतही महाविकास आघाडीच्या उमेदरवारांना विजय मिळाला आहे, असे निलम गोऱ्हे म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER