देओल कुटुंबात बॉलिवूडमधली अभिनेत्री पत्नी नको म्हणून दूर झाले होते नीलम आणि बॉबी देओल

Maharashtra Today

धर्मेंद्रने (Dharmendra) बॉलिवूडमध्ये नायक म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यानंतर त्याचे काही नायिकांबरोबर प्रेम जुळले होते. यात अगदी मीना कुमारीपासून हेमा मालिनीपर्यंत अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. बॉलिवूडमधील अभिनेत्रींवर धर्मेंद्र प्रेम करीत असला तरी बॉलिवूडमधली अभिनेत्री घरी सून म्हणून नको यावर तो ठाम होता. आपल्या घरातील मुलींनी बॉलिवूडमध्ये काम करू नये असे त्याला वाटत होते आणि आहे. त्यामुळेच बॉबी देओल (Bobby Deol) आणि नीलम कोठारी (Neelam Kothari) यांची लव स्टोरी अर्धीच राहिली. धर्मेंद्रमुळे बॉबी आणि नीलम एकत्र आले नसले तरी नीलमने मात्र मी बॉबीसोबत राहू शकत नसल्याचे मला जाणवले आणि तेव्हाच आम्ही दोघांनी दूर होण्याचा निर्णय घेतला असे एका मुलाखतीत सांगितले.

बॉबी देओलने १९९५ मध्ये ‘बरसात’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. पहिल्याच सिनेमाने तो प्रचंड लोकप्रिय झाला. याच काळात नीलमनेही बॉलिवूडमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला होता. नीलम आणि बॉबीचे सूत जुळले आणि दोघेही सीरियस रिलेशलनशिपमध्ये होते. जवळ जवळ ५ वर्ष हो दोघे एकमेकांना डेटिंग करीत होते. याबाबत आजवर कधीही बॉबी किंवा नीलमने खुलेपणाने काहीही सांगितले नव्हते. बॉबीबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर नीलमने सांगितले होते, ‘मी आणि बॉबी वेगळे झालो हे खरे आहे. पण मला आता त्याबाबत काहीही बोलायचे नाही. काही अफवा पसरत होत्या त्यामुळे मी वेगळे झाल्याचे स्पष्ट करीत आहे. काही जण म्हणतात की, पूजा भट्टमुळे आम्ही वेगळे झालो. पण तसे काही नाही. खरे तर असे वेगळे होणे खूप त्रासदायक असते. पण ५ वर्ष एकत्र राहिल्यानंतर अचानक मला जाणीव झाली की मी बॉबीबरोबर सुखी राहू शकत नाही. मी याबाबत बॉबीबरोबर चर्चा केली आणि आम्ही दोघांनी मिळून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

नीलमने पुढे सांगितले, धर्मेंद्र किंवा सनी देओल यांच्याबाबतीत माझ्या मनात कसलीही नाराजी नाही. आमच्या वेगळे होण्यात या दोघांचाही काहीही हात नाही. सनी माझा चांगला मित्र आहे असेही नीलमने सांगितले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button