महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याची गरज : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

मुंबई :- राज्यातील कोरोना रुग्णांच्या (corona patient) वाढत्या संख्येबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यासंबंधी फडणवीस यांनी महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याची गरज असल्याचे ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे .

राज्यात काल कोरोनाच्या एकूण ४०,०१७ चाचण्या झाल्या. त्यामुळे १५,७३८ इतक्या लोकांना कोरोनाची झाली आहे . हे पाहता संसर्ग दर ३९.३३ टक्के इतका विक्रमी आहे. हाच दर गेल्या १६ दिवसांपासून सुमारे २५ टक्के इतका होता. एकट्या मुंबईत काल ८४०६ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १८३७ इतक्या जणांना कोरोनाची लागण झाली आहे . यानुसार संसर्ग दर २१.८५ टक्के इतका आहे, अशी माहिती फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये दिली.

दरम्यान महाराष्ट्रात ९ लाख १६ हजार ३४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील २४ तासांमध्ये १५ हजार ७३८ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता १२ लाख २४ हजार ३८० इतकी झाली आहे. यापैकी ९ लाख १६ हजार ३४८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. मागील २४ तासांमध्ये ३४४ कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ३३ हजार १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER