राष्ट्रवादीच्या ‘या’ दिग्गज आमदाराला कोरोनाची बाधा

Coronavirus - Sunil Tingre

पुणे : गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाने (Corona) राज्यासह पुण्यात हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी, समाजसेवक, मंत्री ते बॉलिवूड स्टार्सपर्यंत अनेकांना कोरोनाने बाहुपाशात घेतले आहे. यातच, आता पुण्यातील वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

आमदार सुनील टिंगरे यांनी कोरोना चाचणी केली असता त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सुनील टिंगरे यांना काही दिवसांपूर्वी थोडी कणकण आणि ताप येत होता. ही लक्षणं कोरोनाची असल्यामुळे त्यांनी वेळ वाया न घालवता लगेच कोरोनाची टेस्ट करून घेतली. काल रात्री त्यांनी याबाबत ट्विट करून कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले. सुरुवातीची काही लक्षणे दिसत असल्याने, मी कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझ्यातील लक्षणे सौम्य असून खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल झालो आहे. गेल्या काही दिवसांत मुख्य संपर्कात आलेल्या सर्वांना मी विनंती करतो की, स्वतःला विलगीकरणात ठेवावे व काळजी घ्यावी.” असे ट्विट त्यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER