राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची कोरोनावर मात

NCP

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . अनेक राजकीय नेतेही कोरोनाच्या विळख्यात सापडले असून अनेक जण यातून बाहेरही पडले आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने (Yashwant Mane) यांनी कोरोनावर मात केल्याची माहिती आहे .

मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादामुळे मी कोरोनाला हरवू शकलो. त्यामुळे या पुढील काळात मतदार संघातील अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी लवकरच मतदार संघात येणार असल्याची माहितीही माने यांनी दिली .

कोरोना संसर्गाच्या काळामध्ये आमदार यशवंत माने यांनी मतदार संघातील जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी नियमित भेटी देऊन समस्या जाणून घेण्याचा नित्यक्रम ठेवला होता. त्यादरम्यानच पुणे दौऱ्यावरून परत आल्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या शिवाय त्यांची पत्नी, मुलगी व स्वीय सहाय्यक संतोष ननवरे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान तब्बल बारा दिवस उपचार घेतल्यानंतर आमदार यशवंत माने यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगी तसेच स्वीय सहाय्यक पत्रकार संतोष ननवरे यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. ३ सप्टेंबर रोजी त्यांना डिस्चार्च मिळाला आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER