राष्ट्रवादीची ताकद शिवसेनेपेक्षा जास्त; निवडणुकीत त्यांची मदत होईल- संजय राऊत

Sanjay Raut - Sharad Pawar

मुंबई : आगामी महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रित लढाव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) चांगली कामगिरी केली. नंबर दोनवर पक्षाने आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे शिवसेनेपेक्षा (Shivsena) राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज व्यक्त केले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

साहजिकच आगामी महापालिका निवडणुकीत ज्या महापालिकेत ज्या पक्षाची ताकद जास्त आहे, त्या पक्षाने पुढाकार घेऊन आघाडी करावी असा विचार करू. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी निवडणुका एकत्र कशा लढता येतील यावर आम्ही शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी चर्चा करू. एकत्र निवडणूक लढली तर नक्कीच त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच (Mahavikas Aghadi) होईल. राष्ट्रवादीची ताकद जास्त असल्याने महापालिका निवडणुकीतही त्यांचे उमेदवार जास्त निवडून येण्याची शक्यता आहे. सत्ता काबीज करण्यासाठी मदत होईल, असेही राऊत म्हणाले.

इंदिरा गांधी यांच्या काळात उघड पद्धतीने आणीबाणी लागू केली गेली होती. आता मात्र छुप्या पद्धतीने आणीबाणी लागू झाली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोरोना कसा वाढू शकतो याचा अभ्यास केला होता. ते दूरदृष्टीचे नेते आहेत. मात्र विरोधकांनी राजकारण केल्यानंतर हळूहळू सर्व गोष्टी उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. आता राज्यात कोरोना (Corona) रुग्ण वाढत आहेत. याची जबाबदारी विरोधक घेणार आहेत का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या मास्टर स्ट्रोकमुळे अब्दुल कलाम हे राष्ट्रपती झाले. कलाम हे सर्वमान्य उमेदवार व्हावेत त्यामुळे प्रमोद महाजन, वाजपेयी यांनी प्रयत्न केले. मात्र काही लोक या गोष्टीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यात त्यांचं हसं होत आहे. शेतकऱ्यांची संख्या कमी झाली असेल; पण ज्या पद्धतीने टिकैत राजस्थान, हरियाणा यासारख्या राज्यांत ज्या पद्धतीने महापंचायत घेत आहेत, त्यावरून शेतकरी आंदोलन कमी होतंय हे म्हणणं चुकीचं ठरेल, असे मतही त्यांनी नोंदविले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER