विदर्भात राष्ट्रवादीची ताकद वाढली; तेली समाजाचे वरिष्ठ नेते राष्ट्रवादीत

मुंबई :- महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) सुगीचे दिवस आले आहेत. राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत असून, आज विदर्भातील तेली समाजाचे नेते निळकंठ पिसे (Nilkanth Pise) यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला. विदर्भात तेली समाज मोठ्या प्रमाणात असल्याने पिसे यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जयंत पाटील (Jayant Patil) यांनी निळकंठ पिसे यांना पक्षप्रवेश दिला व त्यांचे राष्ट्रवादी पक्षात स्वागत केले. आज मुंबईच्या राष्ट्रवादी भवन येथे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

ही बातमी पण वाचा : भविष्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री? शरद पवार परिस्थितीनुसार निर्णय घेतील, जयंत पाटलांचे विधान

यावेळी पक्षाचे सरचिटणिस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, पक्षाचे उपाध्यक्ष प्रा.दिवाकर गमे, ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राज राजापूरकर, युवक अध्यक्ष मेहबूब शेख, सूरज चव्हाण, माजी आमदार प्रकाश गजभिये, विनय डहाके उपस्थित होते.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button