राष्ट्रवादीची सोशल इंजिनीअरिंग सुरू ; खडसे, आदिती नलावडे, आनंद शिंदे विधान परिषदेवर?

Khadse & Shinde & Nalwade

मुंबई : राज्यपाल नियुक्त 12 जागाांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या सदस्यांची यादी तयार केली आहे. त्यात भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादीत आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse), आदिती नलवाडे (Aditi Nalwade) आणि प्रसिद्ध पार्श्वगायक आनंद शिंदे (Anand Shinde) यांच्या नावाची चर्चा आहे .

राज्यपाल नियुक्त जागेवर विविध समाज घटकातील चेहऱ्यांना संधी देऊन सोशल इंजिनीअरिंग साधण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचे दिसते . राज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच नियुक्ती होणार आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेससह राष्ट्रवादीनेही आपल्या सदस्यांची यादी तयार केली आहे. ही यादी तयार करताना राष्ट्रवादीने सामाजिक बांधिलकी जपली जात आहे .

राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, आनंद शिंदे, आदिती नलावडे आणि शिवाजी गर्जे या चार जणांना विधान परिषदेवर पाठवणअयात येणार असल्याची चर्चा आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले मातब्बर नेते एकनाथ खडसे यांनाही विधान परिषदेत पाठवण्याच्या राष्ट्रवादीने हालचाली सुरू केल्या आहेत.

कनाथ खडसे :
खडसे हे ओबीसी समाजातून आलेले आहेत. ओबीसी समाजावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे छगन भुजबळ आणि खडसे या दोन ओबीसी नेत्यांच्या साथीने ओबीसी मतांकडे आपला कल असण्यावर पवारांचा भर असणार आहे. ‘

आनंद शिंदे :
आनंद शिंदे हे प्रसिद्ध गायक असून महाराष्ट्रात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. शिवाय ते दलित समाजातून आले आहेत. विशेषत: ते रिपब्लिकन चळवळीतही सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊन दलितांची मते वळवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे.

आदिती नलावडे :
आदिती नलावडे या राष्ट्रवादीच्या मुंबईच्या संघटक आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊन मुंबईत राष्ट्रवादीची ताकद निर्माण करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER