शिरोळ तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का

ncp

कोल्हापूर :-  शरद पवार यांचे कट्टर समर्थक शिरोळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मंगळवारी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी गेल्या पाच वर्षापासून शिरोळ मधून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.

मतदार संघ काँग्रेसच्या वाटणीला जाणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत सामील झाल्यास शिरोळ मतदारसघ काँग्रेसकडून स्वाभिमानीसाठी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यड्रावकर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत वंचित बहुजन आघाडीची साथ धरली. शिरोळ तालुक्यातील ते वंचित कडून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. शिवसेनेचे विद्यमान आमदार उल्हास पाटील, उंचीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि स्वाभिमानी संघटना यांच्यात आता चुरशीचा तिरंगी सामना होईल.