विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे राजू मिसाळ यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब

Raju Misal

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) विरोधी पक्षनेते नाना काटे (Nana Kate) यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागेवर विरोधी पक्षनेता कोण याबाबत चर्चा सुरू झाली. या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीचे आमदार राजू मिसाळ (Raju Misal)यांच्या नावावर पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये भाजपची (BJP) सत्ता असून प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या नगरसेवकांना विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रत्येकी एक वर्षाचा कालावधी निश्‍चित केला आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत पिंपरी चिंचवड महापालिकेत तीन विरोधी पक्षनेते झाले आहेत.

तिसरे विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा कार्यकाळ 1 ऑगस्ट रोजी संपला. कोरोना संकटामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात यावी, असे काटे समर्थकांनी पक्षश्रेष्ठींना सुचविले होते. मात्र तसे होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केल्यामुळे नाना काटे यांनी राजीनामा दिला.

आज विरोधी पक्षनेते पदासाठी पक्षाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. त्यामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून नगरसेवक राजू मिसाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, पक्षाच्या बैठकीत विरोधी पक्षनेते पदासाठी नाव निश्चित झाल्यानंतर ते नगगरसचिव यांच्याकडे पाठविले जाते ते अद्याप पाठविले नसल्याचेही समजते.

पक्षाच्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेत्याचे नाव नश्‍चित झाल्यानंतर त्याचा प्रस्ताव महापालिका नगरसचिवांकडे देण्यात येतो. तो प्रस्ताव नगरसचिव विभागीय आयुक्तांकडे पाठवितात. विभागीय आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर महापौर विरोधी पक्षनेत्याचे नाव घोषित करतात.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी मिसाळ यांचे नाव निश्‍चित करण्यात आले आहे. मात्र दुपारपर्यंत नगरसचिवांकडे प्रस्ताव देण्यात आलेला नाही.

यावर, विरोधी पक्षनेते पदासाठी अद्याप माझ्याकडे प्रस्ताव आला नाही. प्रस्ताव आल्यानंतर तो विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर आठ दिवसांत विभागीय आयुक्तांची मान्यता मिळेल. त्यानंतर महापौर नाव घोषित करतील असे महापालिका नगरसचिव उल्हास जगताप यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER