शिवेंद्रराजे भोसलेंना राष्ट्रवादीची ऑफर…

सातारा :- राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सध्या इनकमिंग जोरात सुरू आहे. राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेच्या निमित्ताने अनेक नेते राष्ट्रवादीच्या जवळ जातानाही दिसत आहेत. त्यानंतर आता सातारा येथून मोठी माहिती मिळत आहे. सातारा नगरपालिकेची निवडणुक आता जवळ आली आहे. नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) आणि राष्ट्रवादीतील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (NCP) पॅनेल टाकणार आहे.

राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे स्वतः या निवडणुकीत लक्ष घालणार आहे. या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांनी मोठे विधान केले आहे.

शशिकांत शिंदे यांनी या निवडणुकीच्या निमित्तानं शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांना एक ऑफर दिली आहे. भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीत आले तर ते नगरपालिका निवडणुकीचे नेतृत्व करतील, अशी ऑफर शशिकांत शिंदे यांनी आज साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसलेंना दिलीय. त्यामुळे शिवेंद्रराजे भोसले काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीही शिवेंद्रराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात वाद झाला होता. साताऱ्यात पक्ष वाढीसाठी संघर्ष करायला तयार असल्याचं शशिकांत शिंदेंनी म्हटलं होतं.

या वादावर शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर देताना माझ्यामध्ये आणि शिवेंद्रराजेंमध्ये कोणाताही वाद नाही. मी माझं पक्ष वाढविण्यासाठी काम करतो. जावळी मतदारसंघामध्ये माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत. मी माझ्या मतदारसंघामध्ये आता काम करत आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे तसं वाटत असावे. मात्र, पक्षवाढीसाठी संघर्ष करायला लागला तर मी तयार आहे, असंही शशिकांत शिंदे म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER