कोल्हापुरात राष्ट्रवादीची मुसंडी

NCP

कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतीपैकी 47 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ग्रामपंचायतींचा निकाल दिवसरभरात लागला. यामध्ये राष्ट्रवादी 134 ग्रामपंचायतीवर बाजी मारली. काँग्रेस दुसऱ्या स्थानावर राहिली. यानंतर शिवसेना (Shivsena) आणि भाजपने जागा पटकावल्या. अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व आहे. 433 ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसला 102 ठिकाणी यश मिळाले. शिवसेना 68 ठिकाणी विजयी झाली. ७२ ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली. तर भाजपला ३९ ठिकाणी विजयश्री खेचून आणला. माजी मंत्री विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाने १८ ग्रामपंचायतीवर ताबा मिळवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER