राष्ट्रवादीचे मिशन २०२४ : आता प्रशांत किशोर ठरवणार पक्षाची पुढील रणनीती?

Prashant Kishor - Sharad Pawar - Maharashtra Today

मुंबई :- गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला २२वा वर्धापनदिन साजरा केला. मुंबईच्या प्रदेश कार्यालयात संपन्न झालेल्या या सोहळ्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाची पुढील भूमिका स्पष्ट करत २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी दमदार कामगिरी करेल, असा विश्वास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला होता. त्याच अनुषंगाने शरद पवार (Sharad Pawar) एक्शन मोडवर आले आहे. कारण पश्चिम बंगालमध्ये भाजपचे स्वप्न धुळीस मिळवणारे राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर हे आता राष्ट्रवादीची पुढील रणनीती ठरवणार आहे. काही वेळातच प्रशांत किशोर (Prashant Kishor) आणि शरद पवारांमध्ये महत्वाची बैठक होणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये चुरशीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसला विजय मिळवून भाजपची स्वप्ने उधळून टाकण्यात महत्वाची भूमिका बजावणारे प्रशांत किशोर आज सकाळी पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी येणार आहेत. या भेटीत शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात काय चर्चा होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. पवार यांनी गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात आगामी काळात महाविकासआघाडी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढवेल, असे म्हटले होते. त्यामुळे शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट म्हणजे कुठल्या तरी निवडणुकांचीच तयारी असणार हे निश्चित मानले जात आहे. प्रशांत किशोर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींसोबत काम केले होते. नंतर त्यांनी पंजाब, बिहारमध्येही निवडणूक रणनीतीकर म्हणून काम बघितले. ममता बॅनर्जींचा विजयही त्यांनी सोपा केला. त्याच पार्श्वभूमीवर ते आता शरद पवारांना भेटत आहेत. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांनी भेट नेमकी कुठल्या मुद्द्यावर होणार आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर भाजपला पर्याय असणाऱ्या आघाडीबाबत काही चर्चा होऊ शकतात का, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीकडून भाजपला खिंडार, लातूरमधील भाजपचे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button