राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

NCP Helping Flood Victims

ठाणे : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कऱ्हाड, कोल्हापूर भागातील पूरग्रस्तांना मदतीसाठी विविध पक्ष, सामाजिक संस्था-संघटना पुढे सरसावल्या आहेत. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकमान्य नगर, विभाग यांच्या पुढाकारानेदेखील पूरग्रस्तांना भरघोस अशी मदत रविवारी रवाना करण्यात आली.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीची गळती सुरूच ; राणाजगजितसिंह पाटील भाजपच्या वाटेवर

सांगली, कऱ्हाड, कोल्हापूर भागातील गावेच्या गावे जलमय झाल्याने बेघर झालेल्या नागरिकांना नवे-जुने कपडे, सॅनिटरी नॅपकिन्स, औषधे, किराणा व अन्नधान्य, चपला-बूट, अंथरूण-पांघरूण, पाणी, भांडी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकमान्य नगर, विभागाच्यावतीने पुढाकार घेतला आहे.  नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह लोकमान्यनगरमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक, कार्यकर्त्यांच्यावतीने पूरग्रस्तांना ही मदत करण्यात आली आहे.

रविवारी दोन ट्रक भरून सुमारे चार गावांना पुरेल इतकी मदत रवाना करण्यात आली. यावेळी नगरसेवक हणमंत जगदाळे, नगरसेविका राधाबाई जाधवर, नगरसेवक दिगंबर ठाकूर, नगरसेविका वनिता घोगरे, विभागाध्यक्ष संतोष पाटील, ब्लॉक अध्यक्ष सुधाकर नाईक, समाजसेवक प्रशांत जाधवर, वार्ड अध्यक्ष पुरुषोत्तम ठाकूर,संदीप घोगरे आदी लोकमान्यनगर  विभागातील सर्व वार्ड अध्यक्ष, महिला अध्यक्ष, युवक अध्यक्ष, सर्व कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : कोकणातही काँग्रेस-राष्ट्रवादीला भगदाड?, ६ आमदार भाजपच्या संपर्कात