सांगली महापालिकेवर यंदा राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार? ऐनवेळी भाजपचे 9 नगरसेवक गायब

सांगली :  येत्या 23 फेब्रुवारीला सांगली महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक होणार आहे. मात्र सांगली महापालिकेचे (Sangli Municipal Corporation) महापौरपद यंदा भाजपच्या हातून निसटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऐनवेळी भाजपचे 9 नगरसेवक (9 BJP corporators)नॉट रिचेबल असल्याने येथे घोडाबाजाराची शक्यता अधिक बळावली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या गोटात धाकधूक वाढली आहे. भाजपमधील नाराजीचा फायदा उठवत राष्ट्रवादी (NCP)आणि काँग्रेसची सत्तांतरासाठी व्यूहरचना रचल्याची माहिती आहे.

महापौर – उपमहापौर निवडीवरून भाजपमध्ये नाराजी नाट्य आहे. 9 नगरसेवक पक्षाच्या बैठकीला उपस्थित नसल्याने तसेच त्यांचा पत्ताही भाजपला लागत नसल्याने पळवा पळवीची चर्चा सांगलीत रंगली आहे.

भाजपमधील कुरबुरीचा फायदा आघाडीचे पक्ष घेणार यांत शंका नाही. बुधवारी सायंकाळी भाजपकडून महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौर पदासाठी गजानन मगदूम यांचे नाव निश्चित झाले. भाजपची नावे निश्चित होताच राष्ट्रवादीचे नेते ‘ॲक्शन मोड’मध्ये आले असून त्यांनी भाजपच्या नाराज नगरसेवकांशी संपर्क साधला व या नगरसेवकांना गळाला लावण्याचे काम सुरू झाले आहे.

एकीकडे भाजपला सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ता उलथवण्यासाठी पाच नगरसेवकांची गरज आहे. सध्या नऊ नगरसेवक गायब आहेत. त्यापैकी किती जण आघाडीच्या गळ्याला लागतात, यावर सत्तेचे गणित अवलंबून आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER