कोल्हापूर महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकुया : हसन मुश्रीफ

Hasan Mushrif

कोल्हापूर :- महापालिका निवडणुकीत (Kolhapur Municipal Corporation) राष्ट्रवादीचा झेंडा फडकुया, असे आवाहन ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नूतन जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी सकाळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. कागल तालुका सहकारी खरेदी विक्री संघ्याच्या इमारतीत हे कार्यालय सुरू करण्यात आले.

त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमास माजी आमदार के. पी. पाटील, संध्यादेवी कुपेकर, अशोकराव जांभळे, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, उद्योगपती व्ही. बी. पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, सदस्य युवराज पाटील, विजय बोरगे, मनोज फराकटे तसेच पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आजी माजी नगरसेवक या कार्यक्रमास उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER