भाजपच्या गडाला रोहित पवारांकडून सुरूंग, राम शिंदेंच्या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा

Rohit Pawar-Ram Shinde

अहमदनगर : जिल्ह्यातील एकूण 767 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. त्यातील 53 ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडणूक पार पडली आहे. उर्वरित ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. पण, अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपला गडाला खिंडार पाडले आहे.

रोहित पवारांनी भाजपचे माजी मंत्री राम शिंदेंना (Ram Shinde) धक्का दिला आहे. चौंडी ग्रामपंचायतीत 9 पैकी 7 जागा रोहित पवारांच्या गटाला तर 2 जागा राम शिंदे गटाला मिळाल्या आहेत. जामखेड (जि. अहमदनगर) तालुक्यातील सर्वात मोठी खर्डा ग्रामपंचायतमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. या आधी या ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता होती. आजचा निकालात राष्ट्रवादीने 11 तर भाजपने सहा जागा जिंकल्या आहेत. आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील ही महत्वाची ग्रामपंचायत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER