राष्ट्रवादीचा ‘सांगली पॅटर्न’ पिंपरी-चिंचवड पालिकेमध्ये अयशस्वी ; भाजपचा दणदणीत विजय

BJP-NCP - Maharastra Today
BJP-NCP - Maharastra Today

मुंबई : राष्ट्रवादीचा ‘सांगली पॅटर्न’ (Sangli pattern) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (pimpri-chinchwad-municipal-corporation) स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत अयशस्वी ठरला आहे . भाजपचे (BJP) उमेदवार नितीन लांडगे (Nitin Landage) विजयी झाले आहेत तर राष्ट्रवादीचे उमेदवार प्रवीण भालेकर यांना लांडगे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. भाजपाच्या उमेदवाराला 10 तर राष्ट्रवादीला 5 मते मिळाली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयातील स्थायी समितीच्या सभागृहात आज ही निवडणूक झाली. पुण्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.

महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. स्थायी समितीतील संख्याबळानुसार, या निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित होता. मात्र, तरीही भाजपमध्ये अंतर्गत बंडाळीचा फायदा आम्हाला होईल आणि भाजपचे नाराज नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा करत राष्ट्रवादीने आपला उमेदवार म्हणून नगरसेवक प्रवीण भालेकर यांना रिंगणात उतरविले. मात्र, आज झालेल्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला.

स्थायी समितीत 16 सदस्य आहेत. यात भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा एक नगरसेवक आहे.

भाजपचे नितीन लांडगे, रवी लांडगे, सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे, भाजप संलग्न नीता पाडाळे, राष्ट्रवादीच्या पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर, राजू बनसोडे, प्रवीण भालेकर आणि शिवसेनेच्या मीनल यादव असे 16 सदस्य स्थायी समितीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER