होळीपूर्वीच राष्ट्रवादीने गुलाल उधळला, कर्जत पंचायत समितीत राष्ट्रवादीचा सभापती बिनविरोध

अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar news) जिल्ह्यातील कर्जत पंचायत समितीच्या सभापती पदासाठी झालेली निवडणूक बिनविरोध संपन्न झाली. राष्ट्रवादीच्या मनिषा जाधव यांची सभापतीपदी वर्णी लागली आहे. या निवडणुकीवेळी भाजपचे (BJP) दोन सदस्य अनुपस्थित होते. तर शिवसेनेचा एकमेव सदस्य प्रशांत बुद्धीमत महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सामील झाला. त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी सोपी झाली. सभापती बिनविरोध निवडून आल्याने राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांनी होळीआधीच गुलाल उधळत जल्लोष केला. तर दुसरीकडे कर्जत पंचायत समितीवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडीनंतर मनिषा जाधव यांचा सत्कार करण्यात आला. तर कार्यकर्त्यांनी होळीआधाीच गुलालाची उधळण करुन जल्लोष केला. गेल्या वर्षीही अहमदनगरमध्ये भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जबर धक्का दिला होता. कर्जत पंचायत समितीमधील भाजपची सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली. आठ सदस्य असलेल्या कर्जत पंचायत समितीमध्ये सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या अश्विनी काणगुडे यांचा विजय झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER