राष्ट्रवादीचा ‘एमआयएम’ला मोठा धक्का; दहापैकी सहा नगरसेवक लवकरच राष्ट्रवादीत

Jayant Patil - Taufiq Shaikh

सोलापूर :- राज्यात महाविकासआघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) मोठ्याप्रमाणात इनकमिंगला सुरूवात झाली आहे. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी गळती लागलेल्या राष्ट्रवादीत आता दररोज इनकमिंग सुरु आहेत. यामध्ये आता सोलापूरमधील (Solapur) एमआयएम (MIM) पक्षाचे नेते तौफिक शेख (Taufiq Shaikh) यांच्यासह इतर नगरसेवकांची भर पडली आहे.

गेल्या काही दिवसांपासून तौफिक शेख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु होती. मात्र, आता त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. तौफिक शेख यांनी नुकतीच मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांची भेट घेतली. आता ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची वेळ घेऊन सहा नगरसेवकांसह सोलापुरमध्येच कार्यक्रम घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश करतील.

सोलापूर महानगरपालिकेतील दहापैकी सहा नगरसेवक तौफिक शेख यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तर उर्वरित चार नगरसेवकांनीही पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एमआयएमचे पालिकेतील संख्याबळ दहावरून थेट शून्यावर जाणार आहे.

तौफिक शेख यांनी 2014 मध्ये सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंविरोधात निवडणूक लढवली होती. यात प्रणिती शिंदे आणि तौफीक शेख यांच्यात चुरशीची लढत झाली होती. सोलापूर शहर मध्य हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. परिणामी तौफिक शेख यांच्या येण्याने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आणखी वाढणार आहे.

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारांच्या प्रचारासाठी जयंत पाटील सोलापूर दौऱ्यावर आले होते. सोलापुरातील हेरिटेज हॉल येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्यानंतर जयंत पाटील यांनी आवर्जुन तौफिक शेख यांची भेट घेतली होती. यावेळी जयंत पाटील यांनी म्हटले होते की, कुछ दिनों बाद तौफिक भाई आपको मुंबई आना होगा, या मैं फिर सोलापूर आऊंगा. आप जैसे तय करेंगे वैसे होगा.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी-काँग्रेसची भाजपला साथ, चंद्रकांतसदादांच्या गावात शिवसेनेला धक्का

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER