राष्ट्रवादीचा काँगेसला जबर धक्का, नाशिकचा बडा नेता २५ तारखेला घड्याळ बांधणार

Maharashtra Today

नाशिक :- राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसला मोठा धक्का देणार आहे. यासाठी तारीखही निश्चित करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख (Asif Sheikh) यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. येत्या २५ मार्चला आसिफ शेख मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षात प्रवेश करून मनगटावर घड्याळ बांधणार आहे. आसिफ शेख आपल्या असंख्य समर्थकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत(NCP) प्रवेश करणार आहेत.

आसिफ शेख यांनी गेल्या महिन्यात काँग्रेसला रामराम ठोकला होता. आसिफ शेख यांनी वैयक्तिक कारणासाठी पक्ष सोडत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ते कोणत्या पक्षात जातील याची उत्सुकता अनेकांना लागली होती. अखेर आसिफ शेख यांचा राष्ट्रवादी प्रवेश ठरला आहे.

ही बातमी पण वाचा : पवारांचं ठरलं ; पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी पार्थ पवारांना उमेदवारी, मात्र अजितदादा संभ्रमात

आसिफ शेख यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने मालेगावातील राजकीय परिस्थिती नक्कीच बदलणार आहे. मालेगाव शहरात शेख कुटुंबिय कॉंग्रेसचे निष्ठावंत मानले जातात. आसिफ शेख यांचे वडील काँग्रेसचे कट्टर समर्थक असून गेल्या कित्येक वर्षांपासून ते काँग्रेसमध्ये सक्रीय आहे. मालेगाव महापालिकेत ही काँग्रेस- शिवसेनेची सत्ता आहे. राष्ट्रवादी मात्र विरोधात आहे

मागील वीस वर्षापासून मी काँग्रेसमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केले. प्रामाणिकपणे काम करताना मालेगावातील जनतेची सेवा केली. माझ्या वैयक्तिक कारणासाठी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करुन पुढील दिशा ठरविली जाईल. कोणत्या पक्षात प्रवेश करायचा हे सर्वस्वी कार्यकर्त्यांच्या निर्णयावरच अवलंबून असेल. १५ दिवसानंतर अंतिम निर्णय घेऊ, असे आसिफ शेख काँग्रेसला दिलेल्या राजीनाम्यानंतर म्हणाले होते.

ही बातमी पण वाचा : तुम्ही केलेली फोडाफोडी ‘भद्र’ आणि आमची युती अभद्र? शिवसेनेची भाजपवर टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER