पुणे पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादीचे अरुण लाड यांचा ऐतिहासिक मतांनी विजय

Arun Lad

पुणे : पुणे (Pune) पदवीधर मतदारसंघावर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अरुण लाड (Arun Lad) यांनी या निवडणुकीत ऐतिहासिक मते मिळवून विजय प्राप्त केला. या निवडणुकीत अरुण लाड यांना तब्बल १ लाख २२ हजार १४५ मते मिळाली आहेत, तर भाजप (BJP) उमेदवार संग्रामसिंह देशमुख (Sangram Singh Deshmukh) यांना ७३ हजार ३२१ मते मिळाली आहेत. लाड यांनी या निवडणुकीत ४८ हजार ८२४ मतांची आघाडी मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. लाड यांनी १ लाख १४ हजार १३७ मतांचा कोटा पूर्ण करून विजय मिळवला.

दरम्यान, अंतिम निकाल येण्यापूर्वीच लाड यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजी सुरु केली होती. दुसऱ्या फेरीतील मतमोजणीनंतर लाड यांचा विजय निश्चित मानला जात होता. आता अंतिम निकाल समोर आले आहेत. अरुण लाड यांच्या विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे.

कोरोनामुळे (Corona) लांबणीवर पडलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड , भाजपचे संग्रामसिंह देशमुख आणि मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यात तिरंगी लढत होईल असे म्हटले जात होते. परंतु अरुण लाड मतमोजणी सुरु झाल्यापासून आघाडीवर होते. या निकालांवरुन ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे स्पष्ट झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER