गोव्यात राष्ट्रवादीची धर्मनिरपेक्ष पक्षांशी युती : शरद पवार

NCP - Sharad Pawar

पणजी : गोव्यात २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही धर्मनिरपेक्ष पक्षांशी युती करणार आहोत. त्यासाठी पक्षाची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपविली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली. पवार यांनी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी ते बोलत होते.

पवार म्हणाले की, गोव्यात आम्ही पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आगामी काळात नियोजन केले जाईल. येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेससह इतर धर्मनिरपेक्ष पक्षांशी युती करणार आहोत. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याबद्दल पवार म्हणाले की, काही लोकांना आरोप करण्याची सवय झालेली असते.

जे काही सत्य आहे ते लोकांपुढे आले पाहिजे. अशा बाबींची चौकशी झाली पाहिजे, सत्य असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी आमची आहे. उगाच कोणी आरोप केले म्हणून कोणाला दोषी धरणे योग्य नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER