राष्ट्रवादी युवक अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा, अटक का नाही? चित्रा वाघ कडाडल्या

मुंबई : राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) युवक अध्यक्ष मेहबूब शेख याच्यावर बलात्काराचा गन्हा दाखल झाला आहे. अशा प्रकरणात आरोपीला अटक करण्यात येते. मात्र, औरंगाबाद पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक केली नाही. आरोपी समोर असताना, चौकशी आणि तपासाच्या नावाखाली आरोपीला अटक करण्यात आली नाही, असा आरोप भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला.

‘शक्ती’ विधयेकावरून टोमणा

राज्यात लागू करण्यात येणाऱ्या शक्ती विधेयकात राजकीय कार्यकर्त्यांसाठी विशेषत: सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी वेगळी तरतूद करण्यात आलीय का? असा टोमणा चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि गृहमंत्री अनिल देशमुख (Anilk Deshmukh) यांना मारला.

ज्या आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्या समर्थनात सोशल मीडियावर कँम्पेन राबवण्यात येते आहे. पीडितेवर आणि तिच्या कुटंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होतो आहे, असा आरोप त्यानी केला.

पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबाला संरक्षण द्यावे आणि औरंगाबाद पोलिसांनी आरोपी मेहबूब शेख याला तात्काळ अटक करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.

औरंगाबाद पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, त्यांनी या सगळ्या प्रकाराशी सबंध नसल्याचा खुलासा केला आहे. औरंगाबाद शहरात शिकवण्या घेणाऱ्या एका तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. १४ नोव्हेंबरच्या रात्री ९ वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणीला महेबूब शेख याने भेटण्यासाठी बोलवले आणि गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेऊन बलात्कार केला, अशी तक्रार संबंधित तरुणीने औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात दिली होती. सिडको पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

मेहबूब शेख यांचा खुलासा

गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आणि मेहबूब इब्राहिम शेख या व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी केली. संबंधित तरुणीला प्रत्यक्ष भेटलो किंवा फोनवर बोललेलो नाही. मी १० आणि ११ तारखेला मुंबईत होतो, माझे मुंबईत कार्यक्रम होते. मी आरोपी असेन तर माझी नार्को टेस्ट करावी, अशी मागणी पोलिसांकडे करतो, असे मेहबबू शेख म्हणाले. १४ नोव्हेंबरला मी गावाला होतो. पोलिसांना सर्व पुरावे माहिती देण्यास तयार आहे. या प्रकरणामागे कोण आहे, याचा पोलिसांनी शोध घ्यावा, असे मेहूबब शेख म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER