‘नाथाभाऊ तुम्ही लवकर राष्ट्रवादीत या’, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा खडसेंना आग्रह

Eknath Khadse

जळगाव : नाराज असलेले भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करतील हे जवळपास निश्चित झालं आहे. पक्षप्रवेशानंतर खडसेंना शोभेल असे मंत्रिपद देण्यास राष्ट्रवादीकडून तयारीही सुरु झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज जळगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली. मुक्ताईनगर इथल्या घरी जात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खडसेंना भेटले. खडसे यांनीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं हसत स्वागत केलं. ‘साहेब तुम्ही लवकर राष्ट्रवादीत या’, असा आग्रह या कार्यकर्त्यांनी खडसेंना केला आहे.

एकनाथ खडसे भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेनं जोर धरलाय. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील खडसेंचे चाहते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुक्ताईनगरला येऊन त्यांची भेट घेत आहेत. दरम्यान, खडसेंच्या पक्षप्रवेशानंतर संघटनात्मक पद, विधानपरिषदेचे सदस्यत्व असे सूत्र यामागे ठरले असून ठाकरे सरकारच्या पुढील मंत्रिमंडळ विस्तारात खडसे यांना मंत्रिपद देण्यावर पवारांनी संमती दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER