नांदेडच्या उमरीमध्ये राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

NCP

नांदेड : तिसऱ्या टप्प्यातील नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला आज (सोमवारी) सुरवात झाली. रविवारी नांदेड जिल्ह्यातील 9 नगरपालिका आणि 2 नगरपंचायती, औरंगाबादमधील 4, भंडारा जिल्ह्यातील 4 आणि गडचिरोली जिल्ह्यातील 2 नगरपालिकांसाठी मतदान झाले.

नांदेड जिल्यातील उमरी नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळालं असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या १७ पैकी १७ जागांवर विजय झाला आहे.
गेल्यावेळेस देखील उमरीमध्ये राष्ट्रवादी सत्ता होती. त्यामुळं यंदा राष्ट्रवादीची प्रतिष्ठा याठिकाणी पणाला लागली होती. परंतु आपली सत्ता राखण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे.

सोबतच उमरीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या अनुराधा खांडरेंचा विजय झाला आहे.