मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देणार – जयंत पाटील

CM Uddhav Thackeray - Sharad Pawar - Jayant Patil

मुंबई : मुंबई महापालिका (BMC) दशकांपासून शिवसेनेच्या (Shiv Sena) ताब्यात आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आमचा शिवसेनेला पाठिंबा राहणार आहे. मुंबई महापालिका निवडणुक शिवसेना, काँग्रस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एकत्र लढणार आहे, असं सांगतानाच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महापालिकेत सत्ता आणण्याचं स्वप्न पाहू नये, त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्पष्ट केलं.

‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना जयंत पाटील यांनी हा दावा केला. मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात असून आमचा शिवसेनेला पाठिंबा आहे. मुंबई महापालिका आपल्या ताब्यात यावी, असं फडणवीसांना वाटणं स्वाभाविक आहे. पण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मित्रपक्ष महापालिकेत एकत्र येणार असून सत्ता आणण्याचं फडणवीसांचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही.

दरम्यान, पाटील यांच्या या विधानामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येण्याचे संकेत मिळाले आहेत. दरम्यान, वीजबिल माफीच्या प्रश्नावर उत्तर देण्यास पाटील यांनी नकार दिला. या प्रश्नावर ऊर्जा मंत्रीच योग्य आणि सविस्तर उत्तर देतील, असं ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER