मवितातील फाटाफुटीमुळे राष्ट्रवादी उद्या करणार शिवसेनेचा गेम

Maharashtra Today

पुणे : पुण्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात आजी-माजी खासदारांच्या बेबनावामुळे महाविकासआघाडीत आज बिघाडी होऊ शकते. खेड पंचायत समिती सभापतीच्या निवडीवरून शिवसेनेचे माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे आमदार एकमेकांसमोर उभे ठाकलेत. इथली महाआघाडी कधी सुरळीत नव्हतीच असे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil)त्यांनी उघडपणे सांगितले आहे.

२७ मे रोजी पुण्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी खेड पंचायत समिती सदस्यांवर सभापतींनी हल्ला केला. सीसीटीव्हीत चित्रित झालेल्या या घटनेने स्थानिक पातळीवरील महाविकासआघाडीतील बिघाडी पुन्हा चव्हाट्यावर आणली. खेडचे सभापती शिवसेनेचे भगवान पोखरकर(Bhagwan Pokharkar) यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल झाला आहे. शिवसेनेचे सहा सदस्य उद्या (३१ मे) रोजी ला या ठरावाच्या बाजूने कौल देणार आहेत.

इथल्या महाविकासआघाडीत कधी सुरळीपणा नव्हताच, याला राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील हेच सर्वस्वी जबाबदार आहेत, असा आरोप करत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेंकडे माजी खासदारांनी चौकशीची मागणी करावी. या दुष्कृत्यात दोषी आढळलो तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. पण तथ्य न आढळल्यास आढळरावांनी तोंड काळं करून तालुक्यात फिराव, असा हल्ला आमदार दिलीप मोहितेंनी केलाय.

गणित

खेड पंचायत समितीवर शिवसेनेची एक हाती सत्ता आहे. शिवसेना – आठ, राष्ट्रवादी काँग्रेस – चार, काँग्रेस – एक, भाजपा – एक असे एकूण चौदा सदस्य आहेत. पैकी शिवसेनेचे सहा सदस्य राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी हातमिळवणी करण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ३१ मे ला आढळरावांचे खंदे समर्थक भगवान पोखरकरांची सभापतीवरून उचलबांगडी होणार हे निश्चित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button