
कोल्हापूर : महानगरपालिकेची निवडणूक ताकदीने लढण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. शिवाजी स्टेडियम येथील पक्षाच्या शहर कार्यालयात महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. पक्षाच्या वतीने सर्वच्या सर्व ८१ प्रभागांमध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
यावेळी बोलताना पक्षाचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्यापासून उमेदवारी मागणीसाठी पक्षाकडे कार्यकर्त्यांची रिघ लागली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ८१ प्रभागांमध्ये ताकदीने लढणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याकरिता कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे.
बैठकीस राजेशलाटकर,नंदकुमार मोरे, अविनाश पाटील, संदीप कवाळे, महेश सावंत, उत्तम कोराने, सुनील पाटील, विनायक फाळके, फिरोज सौदागर, सुनील देसाई, संजय कुराडे यांच्यासह पक्षाचे आजी-माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला