रोहिणी खडसेंना निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकद राष्ट्रवादी काँग्रेस उभी करेल : जयंत पाटील

जळगाव :- राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर (Rohini Khadse Khewalkar) यांचे जे नुकसान मागच्या निवडणुकीत आम्ही केले, ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरून काढू, तसेच निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकद राष्ट्रवादी काँग्रेस उभी करेल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली.

पाटील मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी परिवार परिसंवाद यात्रेनिमित्त बोलत होते. त्याच्या वक्तव्याने अप्रत्यक्षपणे पुढील विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचा पहिला उमेदवारच जाहीर केला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे काल राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त मुक्ताईनगर येथे आले होते.

पुढील विधानसभेत रोहिणी खडसे यांना विजयी करण्यासाठी मुक्ताईनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकद लावणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. रोहिणी खडसे खेवलकर यांचे जे नुकसान मागच्या निवडणुकीत आम्ही केले, ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरून काढू. १५ टक्के मताधिक्याने रोहिणी खडसेंना निवडून आणू. त्यासाठी संपूर्ण ताकद राष्ट्रवादी काँग्रेस उभी करेल, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले. त्यामुळे एक प्रकारे एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांना आमदारकी देण्याचे संकेत राष्ट्रवादीने दिले.

ही बातमी पण वाचा : खडसे आणि मुंडेंमुळे भाजपाला राज्यात ओळख – जयंत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER