शरद पवारांच्या आशीर्वादाने पारनेर नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणणार- निलेश लंके

Sharad Pawar-Nilesh Lanke

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आगामी पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकांना धूळ चारीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणणार असल्याचे सांगत विकासकामांच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे मत पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी व्यक्त केले आहे. पारनेर नगरपंचायतीचे नगरसेवक नंदकुमार औटी यांच्या प्रभागात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा लंके यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

लंके पुढे म्हणाले की, नगरसेवक नंदकुमार औटी यांनी विरोधात असताना देखील १ कोटी ४० लाख रूपयांची विकासकामे केली आहे. त्यामुळे नगरसेवक नंदकुमार औटी व विजय औटी हे कोहिनूर हिरे आहेत. पारनेर नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीत विरोधकांना धूळ चारून नगरपंचायत ताब्यात घेणार आहे.

त्यामुळे आगामी निवडणुकीत पारनेर नगरपंचायतीचा नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असणार आहे. कोरोनाच्या काळात जनतेला सुविधा मिळाव्यात यासाठी संपूर्ण राज्याला आदर्शवत ठरेल असे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर टाकळी ढोकेश्वर येथे उभे केले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे काही प्रस्थापित घराच्या बाहेर पडले नाही अशी टीका लंके यांनी माजी आमदार विजय औटी यांचे नाव न घेता केली.

ही बातमी पण वाचा : खडसेंच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे नेते उताविळ; जळगाव जिल्हा राष्ट्रवादीत बदलाचे वारे!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER